
आंतर शालेय ज्यूदो स्पर्धा ः २९ सुवर्णपदक विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय ग्रामीण जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत जिल्हा ज्यूदो संघटनेच्या बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्यूदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी शानदार प्रदर्शन करत २९ सुवर्णपदक, ९ रौप्य पदक व १२ कांस्यपदक असे एकूण ५० मेडल पटकावली.
सुवर्णपदक विजेत्या २९ खेळाडूंची शालेय विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, रामकिशन मायंदे, लता लोंढे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, भीमाशंकर नावंदे, झिया अन्सारी, विजय साठे,अमित साकला, सुनील सिरस्वाल, मनिंदर बिलवाल, दत्तू पवार, कुणाल गायकवाड बजाजनगर क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, सुधीर काटकर, सागर घुगे, हर्षल महाजन, मंगेश बगाडे, उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू
सुवर्ण पदक मुली ः शारदा शेळके, त्रिवेणी काळे, सांची सोनवणे, धनश्री पवार (एमजीएम संस्कार विद्यालय), अरोही जाधव (ज्ञानभवन इंग्लिश स्कूल), संस्कृती चौधरी, श्रुतकीर्ती खलाटे, गौरी पांचाळ, राजश्री चिकणे,धनश्री चिकणे (ऑर्चिड टेक्नो स्कूल), आराध्या जाधव (ऑर्चिड इंग्लिश स्कूल), आर्वी महापुरे, मृगजा गोमदे, गौरी घुले (भैरोमल तनवाणी विद्यामंदिर), रिया पाटील, ज्ञानेश्वरी जाधव (भीमाशंकर पाडळकर कनिष्ठ कॉलेज), भक्ती लोमटे (अल्फोंसा इंग्लिश हायस्कूल), राजश्री मुसळे (यशश्री प्राथमिक शाळा).
सुवर्णपदक मुले : देवांश समींद्रे, सोहम बडे (भैरोमल तनवाणी विद्यामंदिर), मयूर बनकर (अल्फोंसा इंग्लिश स्कूल) अनुज माडये, (महाराष्ट्र पब्लिक स्कूल), ऋषिकेश घुगे (सरस्वती विद्या मंदिर), संस्कार मुसळे (सिद्धिविनायक ज्युनियर कॉलेज), सुवर्ण दातरंगे (ऑर्चिड टेक्नो स्कूल), साई कदम, श्रेयस सोळंके, यश क्षीरसागर (लिटिल एंजल स्कूल), प्रथमेश पवार (अग्रसेन विद्या मंदिर).
रौप्य पदक : अथर्व सोळंके, विराज पवार, समृद्धी चव्हाण, आरोही राठोड, श्रद्धा निलक, निशा वाघ, यामिनी चौधरी, साधना बेडगे, अनुष्का सोनवणे.
कांस्य पदक : अपूर्वा म्हसे, लावण्या गायकवाड, मंजुषा वाघमारे, तेजस्विनी गायकवाड, हर्षदा मुळे, श्रीहरी चिकणे, सोहम पोपटकर, अविनाश सुरवसे, सोहम कंधारकर, देव काळे, विशाल मुंढे, नील जावळे.