जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे अॅथलेटिक्स खेळाडूंना मोठे पाठबळ

  • By admin
  • September 25, 2025
  • 0
  • 103 Views
Spread the love

जळगाव जिल्ह्यात ७५ हर्ड्ल्स देण्याची सूचना, जामनेरला ५ हर्ड्ल्सचे वाटप

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना नियमित सरावासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते हर्डल्सचे वितरण करण्यात आले.

ॲथलेटिक्स खेळामधील हर्डल्स क्रीडा प्रकारात अनेक खेळाडू जळगाव जिल्ह्यात आहेत. परंतु, जिल्ह्यात हर्डल्स जिल्हा क्रीडा संकुल व्यतिरिक्त कुठेच उपलब्ध नव्हते. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ॲथलेटिक्सच्या शालेय व संघटनाच्या विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करताना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. तालुक्यातील असंख्य खेळाडू हे हर्डल्स क्रीडा प्रकारचा सराव हे असुरक्षित अशा ग्रामीण भागातील उपलब्ध साधनांचा वापर करून करीत होते. तसेच शालेय व संघटनाच्या जिल्हा, विभाग, राज्य स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करीत होते. याबाबत जळगाव जिल्ह्यातील या खेळाडूंना जर हर्डल्स उपलब्ध झाले तर हे खेळाडू शास्त्रोक्त व तांत्रिक पद्धतीने सराव करून या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य अधिक विकसित करू शकतील ही बाब जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांना जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने सांगितली व ही अडचण सोडविण्याची विनंती केली. त्यांनी जिल्ह्यातील खेळाडूंची ही अडचण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सांगितली व त्यांनी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन संलग्नित जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास प्रत्येकी पाच याप्रमाणे ७५ हर्डल्स देण्याचे सूचित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनला पाच हर्डल्स प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ पी आर चौधरी, सचिव राजेश जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनंतराव जाधव, सचिव गिरीश पाटील, जळगाव शहर व तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, चोपडा तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव देविदास महाजन यांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यातील हर्डल्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची सरावाची अडचण दूर केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचे जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व जिल्ह्यातील ॲथलेटिक्स खेळाडू यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्रात हा पहिला उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी राबवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *