शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळी मंडळ हायस्कूलचे घवघवीत यश

  • By admin
  • September 25, 2025
  • 0
  • 116 Views
Spread the love

ठाणे ः ठाणे महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री मावळी मंडळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संघाने चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत लक्ष साळवी याने ८८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. अथर्व परब याने ९८ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. आदित्य जयस्वाल याने ५६ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. दीपक चौधरी याने ८८ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. स्वराज शिंदे याने ५६ किलो वजन गटात कांस्य पदक संपादन केले. अथर्व परबची विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रमोद वाघमोडे यां​चे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व पालक यांनीही पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *