
छत्रपती संभाजीनगर ः एमपीपी स्पोर्ट्स पार्कतर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विवान चव्हाण, दिव्या चौधरी, स्वरुप पवार, श्लोक पाटील, आदित येंगे रेड्डी, अनन्या तुपे, सृष्टी मुळे व मायरा पोळ यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

एमपीपी स्पोर्ट्स पार्क परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक बॅडमिंटन कोर्टवर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमुख अतिथी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिनकर तेलंग यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी दिनकर तेलंग यांनी युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील यांनी संघटनेतर्फे योनेक्स कंपनीचे टी-शर्ट्स भेट दिले. एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे डायरेक्टर अॅड गोपाल पांडे व डायरेक्टर अॅड संकर्षण जोशी यांच्या हस्ते विजेत्यांना टी-शर्ट्स देण्यात आले.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हिमांशु गोडबोले, सदानंद महाजन, सचिन कुलकर्णी, निनाद कुलकर्णी, अर्णव तांबे, विजय भंडारे, निकेत वराडे, निकुंज पांडे यांनी मेहनत घेतली. आभार प्रदर्शन ॲड संकर्षण जोशी यांनी केले.
विविध वयोगटातील अंतिम सामन्याचे निकाल
विवान चव्हाण विजयी विरुद्ध शिवांश काळे (२१-९, २१-५), दिया चौधरी विजयी विरुद्ध मधुरा लोळगे (२१-१९, १८-२१, २४-२२), स्वरूप पवार विजयी विरुद्ध अर्णव घुगे (२१-१२, २२-२०), श्लोक पाटील विजयी विरुद्ध अभिनव पालकर (१४-२१, २१-१५, २१-७), आदित येंगे रेड्डी विजयी विरुद्ध इशान चोबे (२१-६, २१-१३), अनन्या तुपे विजयी विरुद्ध अवनी कुलकर्णी (२१-१४, २१-१६), मायरा पोळ विजयी विरुद्ध आराध्या फुले (१३-२१, २१-०७, २१-७), सृष्टी मुळे विजयी विरुद्ध लावण्य धंदुके (२१-५, २१-८).