
ठाणे ः जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व ठाणे महानगरपालिका तसेच वेटलिफ्टिंग असोसिएशन ठाणे आणि अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
बारा बंगला, कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. ही स्पर्धा १७, १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात झाली. स्पर्धेचे संयोजन अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थापक व प्रमुख प्रशिक्षक दत्तात्रेय टोळे व मनपा ठाणे स्पर्धा प्रमुख प्रमोद वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.
महानगरपालिका क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, ठाणे मनपा क्रीडा समन्वयक शंकर बरकडे, मुख्य प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा टोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, अश्वमेध वेटलिफ्टिंगचे सर्व खेळाडू व सहयोगी कार्यकर्ते यांनी स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित शाळांमधील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धा अत्यंत संगठित पद्धतीने पार पडली आणि सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. उपस्थित सर्व पंच व तांत्रिक कमिटीच्या संयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाॉचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी सर्वांचे आभार मानले व कौतुक केले.