शालेय विभागीय रोलबॉल स्पर्धेसाठी चिखली अर्बन विद्यानिकेतन संघाची निवड 

  • By admin
  • September 26, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः दि चिखली अर्बन विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या रोलबॉल संघाची आंतर शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोल बॉल असोसिएशन चिखली यांच्या तांत्रिक सहकार्याने व दि चिखली अर्बन विद्यानिकेतन स्कूल यांच्या विशेष सहकार्याने शालेय जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धा चिखली येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या १९ वयोगटातील मुलींच्या संघाने विभागीय रोलबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या संघामध्ये समृद्धी सोनुने (कर्णधार), अनुश्री सूर्यवंशी, अवनी तांबे, अश्विनी वैद्य, स्वरा देशमुख, शरयू उबरांडे, विजया नेवरे, श्रावणी चव्हाण, सिद्धी घुबे, लावण्या करवंदे, अनुष्का खेडेकर.सिद्धी यांचा सहभाग आहे. 

दि चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचे क्रीडा शिक्षक तसेच एनआयएस प्रशिक्षक रोलबॉल देवानंद नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुलींच्या संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल शाळेचे अध्यक्ष सतीश गुप्त, शाळेचे सचिव डॉ आशुतोष गुप्ता, शाळेच्या शैक्षणिक संचालिका डॉ पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य गौरव शेटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *