
नागपूर ः श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील देवांशू रत्नशील सातपुते याची निवड शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. देवांशू हा १७ वर्ष वयोगटात ५१ ते ५५ वजन गटात सहभाग घेणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. देवांशू याला संताजी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रिया वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.