
विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः अकोला येथील श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखेचे चार नेटबॉल संघ विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्यातर्फे श्री वसंत देसाई स्टेडियमवर झालेल्या जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित श्री शिवाजी हायस्कूल, मुख्य शाखा, अकोला मधील १४ वर्ष मुले व मुली आणि १७ वर्ष मुले व मुली या संघांनी प्रभात किड्स, विवेकानंद इंग्लिश स्कूल, जी डी प्लॅटिनम हायस्कूल, द नोवेल स्कूल, पोदार इंटरनॅशन या संघावर विजय मिळवत जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीमुळे हे सर्व संघ अमरावती येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत.
या शानदार कामगिरीनिमित्त विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापक विजय ठोकळ यांनी विशेष कौतुक केले. तसेच उपमुख्याध्यापक हिम्मतराव गवई, वरिष्ठ क्रीडा शिक्षक प्रशांत पावडे, मिलिंद लांडे, महेशकुमार काळदाते व सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेते संघ
१४ वयोगट मुले ः रियांश मेंढे (कर्णधार), स्वराज चवरे, वेदांत चुंबळे, आरुष साबळे, ओम दाभाडे, ओम थोनवाल, नैतिक वाघमारे, ओम आगवाने, मयूर मानकर, आदित्य दाभाडे, रिशी खंदारे.
१४ वयोगट मुली ः भावना आगवाणे (कर्णधार), गुंजन बागडे, नव्या तेलगोटे, संस्कृती राऊत, आरती गेडाम, जीविका मेश्राम, आदिती दरेकर, अक्षरा शिंदे, प्रणाली शिरसाट, रसिका राऊत, मयुरी धुरंदर, आरोही रक्षक.
१७ वयोगट मुले ः मोईनुद्दीन चौधरी (कर्णधार), राहुल संगिले, साहिल सैरेसी, नवाजीश खान, सागर वानखडे, वीर बघेरे, सम्यक भिमकर, आयफाज कुरेशी, अमित सैरेशी, शिवा निधाने, प्रसाद इंगळे.
१७ वयोगट मुली ः जया धीगेकर (कर्णधार), सिद्धी बनसोड, इच्छा भिमटे, श्रावणी इंगळे, गौरी गुंजकर, नव्या खंजिरे, लक्ष्मी उंबरकर, जानवी खंडारे, ललिता उंबरकर, आरुषी वानखडे, टीना परदे, रुचिका गोपनारायण.