
नागपूर : एसओएस बेलतरोडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यावतीने इदगाह मैदान नागपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील संघांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. क्रीडांगणावर कौशल्य, जिद्द व खेळाडूवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करत एसओएस बेलतरोडीच्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षक आणि अधिकाऱ्यांची मनं जिंकली. या यशस्वी संघामध्ये अंशुका निंगुटकर, सिद्धी हरोडे, हृदय देशपांडे, अनुक्ति वर्मा, आरोही बावनकर, साक्ष हडके, स्वरा रंगे, समिधा नारंजे, श्रुतिका गावडे, श्रावरी चांदवे, अधिरा मनवतकर, आरोही मेश्राम आणि जानवी ठाकरे या विद्यार्थिनींचा समावेश होता. त्यांना क्रीडा शिक्षक सतीश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या प्राचार्य डॉ उमा भालेराव, उपप्राचार्य आशिष कामडी आणि प्रशासकीय अधिकारी निलय वासाडे यांनी संपूर्ण संघाचे कौतुक करत सतीश भालेराव विशेष आभार मानले. हे यश केवळ शाळेच्या क्रीडावृत्तीचे प्रतीक नसून इतर विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक व सहशालेय उपक्रमात उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यास प्रेरणा देणारे आहे.