
छत्रपती संभाजीनगर ः आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ सुमेध तळवेलकर यांना स्पोर्ट्स मॅनेजमेंट या विषयात छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांच्या हस्ते पदवी प्रदान झाली.

शनिवारी झालेल्या दीक्षांत सोहळ्याला डॉ के के अग्रवाल, पद्मविभूषण एम एम शर्मा, डॉ पी एम जाधव, अंकुशराव कदम, डॉ आशिष गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पीएच डी पदवी प्रदान झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, मंजुषा तळवेलकर, बी एम चौधरी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, डॉ दिनेश वंजारे, डॉ हर्षल तारे, दीपक रुईकर, संतोष आवचार, गणेश बेटूदे यांनी अभिनंदन केले आहे.