
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयाचे ज्यूदो खेळाडू तृप्ती वाघमारे व यशराज फड यांनी जिल्हास्तरीय शालेय १९ वर्षांखालील गटात चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत तृप्ती वाघमारे व यशराज फड या दोघांनी सुवर्णपदक पटकावून आपला ठसा उमटवला. तसेच वैष्णवी तेली हिने रौप्य पदक पटकावले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र पवार यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रा अविनाश वाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ रणजीत पवार यांनी दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.