
छत्रपती संभाजीनगर ः बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जिल्हास्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा आयोजक पवन घुगे गेल्या २० वर्षांपासून मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत अनेक खेळाडू त्यांनी घडवले आहे. त्यांचा विशेष सत्कार पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
ही स्पर्धा छत्रपती नगर देवळाई परिसर, शिवम मंगल कार्यालय या ठिकाणी झाली. मार्शल आर्ट्स मधील बुडो मार्शल आर्ट स्टाईल स्पर्धेचे आयोजन बुडो मार्शल आर्ट. असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर व संयोजक मिशन मार्शल आर्ट्स अँड वुशु कुंग- फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन (इंडिया) छत्रपती संभाजीनगर स्पोर्ट्स अकॅडमीने केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय शिरसाट, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, बुडो मार्शल आर्टचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, सचिव व मुख्य कराटे प्रशिक्षक प्रविन घुगे, शिवाजी हिवाळे, रणजीत ढेपे, रामेश्वर सेलूकर, प्रवीण मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथांच्या हस्ते विजयी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मार्शल आर्ट मुलींच्या स्वसंरक्षणासाठी अत्यंत गरजेचे आहे. मुली कमी वयात मार्शल आर्टस् प्रशिक्षण घेत आहेत. तसेच स्पर्धा खेळून जिल्ह्याचे व राज्याचे नावलौंकिक करत आहे हे कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले. आयोजक पवन घुगे, प्रवीण घुगे व बुडो महाराष्ट्र संघटनेचे लहू पारवे यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रशिक्षक नंदा घुगे, राधा घुगे, अनुश्री घुगे, आरती वाघ, धनश्री शिदवाळकर, कोमल राठोड, श्याम बुधवंत, राम चौरे. गौरव टोकटे, यशोधन घुगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुडो मार्शल आर्ट सचिव व मुख्य कराटे प्रशिक्षक प्रवीण घुगे यांनी केले.
अंतिम निकाल
प्रथम – बुडो मार्शल आर्ट पैठण, द्वितीय – संभाजीनगर शहर बुडो संघ, तृतीय – डिव्हाईन चाईल्ड कॉन्व्हेंट स्कूल बिडकीन.
सुवर्ण पदक – धनश्री वाघ, तनुश्री घुगे, अनुश्री घुगे, ओजस्वी बारगजे, मानसी क्षीरसागर, आश्लेषा रिडलॉन, तनुश्री राठोड, सना सय्यद, तेजल हाडे, गायत्री म्हैसमाले, देवांशी भांजा, मयूर चव्हाण, आयुष नरवडे, शिवराज ढोकणे, शिवम फतपुरे, कोमल फतपुरे, मोक्षदा जैन, रामधन कवले, जयवर्धन आचलिया, अगस्त्य अबोटी, अर्णव रिडलॉन, गजराज चावरिया ओम मुळे.