
नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशन व अभिनव विद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड येथील १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट रणनीती, संघभावना आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड संघाने अक्कलकुवा, धडगाव, शहादा व अंतिम सामन्यात नवापूर या संघाला ९ गुणांनी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला. या जेतेपदामुळे भादवड संघ नाशिक विभागस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
या संघात प्राची पंकज मिस्तरी (कर्णधार), अश्विनी शिवदास भिल (उपकर्णधार), प्रियंका दीपक पाटील, दिव्यांनी नवल पाटील, आदिती संजय पाटील, प्राची अधिकार पाटील, हर्षाली प्रमोद पाटील, मानसी युवराज खोंडे, प्राजक्ता सुनील भिल, प्राची संदीप गिरासे, हर्षाली विरपालसिंग गिरासे, अनुष्का भटेसिंग गिरासे या खेळांचा सहभाग आहे.
तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व खेळाडूंना आरोग्य व शारीरिक शिक्षण शिक्षक भरत मोहन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, सचिव यशवंत पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक ए बी पाटील आणि वरिष्ठ शिक्षक टी जी पाटील, एम डी भाबड, एम बी बोरसे, एम बी शिंदे, एच एस साळुंखे, डी ए चौधरी, डी बी आखाडे, सी एस पाटील, बी एन कुवर, ए टी भिल, व्ही के गिरासे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.