
मलकापूर ः जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विभागीय आंतर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेतून राज्य सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल २१ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. त्यामुळे राज्य स्पर्धेत २१ खेळाडूंची निवड झाली आहे. मलकापूर तालुका क्रीडा संकुल येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये सराव करणाऱ्या सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असोसिएशनच्या तब्बल २१ खेळाडूंची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स बुलढाणा असोसिएशनचे सचिव आणि क्रीडा मार्गदर्शक विजय पळसकर यांचे मार्गदर्शन व अभिषेक मानकर व विवेक जाधव यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
पुढील महिन्यात पुणे येथे संपन्न होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत अमरावती संघ सहभागी होणार आहे. राज्य स्पर्धेत निवड झाल्याबद्दल आमदार चैनसुख संचेती, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, धारपवार, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरगावकर, राजेश महाजन स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्रा नितीन भुजबळ, राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे आदींनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले खेळाडू
१४ वयोगट मुले-मुली ः आर्यन चोपडे, हर्षल तिवणे, आर्या दरेगावे, कृष्णा पाटील, पूर्वा काकडे.
१७ वयोगट मुले-मुली ः स्पर्श तायडे, मयंक पळसकर, कार्तिक कुदळे, भक्ती क्षीरसागर, पलक परदेशी, साक्षी सोळंके, पूर्वा येऊलकर.
१९ वयोगट मुले-मुली ः आयुष बोबडे, मंथन जैन, सार्थक जोगदंड, आदित्य पांडे, सोनल खर्चे, श्रावणी जोगदंड, देवश्री जगताप, विधी वर्मा.