
सातारा ः सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्यावतीने जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन शेंद्रे फाटा-सोनगांव रोड या मार्गावर आयोजन करण्यात आले होते.
शालेय सायकलिंग स्पर्धेचे उद्घाटन सातारा पोलीस स्टेशनचे रायसिंग राजेघोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास सुनील कोनेवाडकर, सुमित पाटील, अक्षय मारकड, कमांडो करिअर अकॅडमीचे संस्थापक दया शितोळे, राजेंद्र माने, पांडुरंग कणसे, विजय यादव, संजय अहिरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या संघाची निवड कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता होणार आहे.