धारावी येथे झालेली किक बॉक्सिंग स्पर्धा संस्मरणीय ठरली

  • By admin
  • September 27, 2025
  • 0
  • 103 Views
Spread the love

मुंबईकर ३८० खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेत मोठी चुरस

मुंबई ः जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा संस्मरणीय ठरली

धारावी येथे झालेली ही स्पर्धा क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी ठरली. मुंबई शहरातील तब्बल ३८० खेळाडूंच्या सहभागामुळे स्पर्धेला भव्य स्वरूप लाभले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, क्रीडा अधिकारी दत्ता माने, क्रीडा मार्गदर्शक फुलचंद, तसेच स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहराचे अध्यक्ष उमेश मुरकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय रेफरी विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विन्स पाटील, सनिकेत साळसकर, राहुल साळुंखे, सांप्रती पाटील, अश्विनी जांबळे, आशिष महाडिक, साहिल बापेरकर, आफताब खान, रेक्स मेल्गीबसन व सय्यद अफ्फान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच तांत्रिक समितीतील सचिन वाडकर व गुलबशा सिद्दिकी यांनी डिजिटल निकाला साठी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, या वर्षी सर्व निकाल तात्काळ संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले. त्यामुळे खेळाडू व पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला.

धारावीतील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात भरलेली ही स्पर्धा केवळ क्रीडांगणापुरती मर्यादित न राहता शालेय पातळीवरील किक बॉक्सिंगला नवे बळ आणि व्यासपीठ मिळवून देणारी ठरली. येथून पात्र ठरलेले खेळाडू आता विभागस्तरीय किक बॉक्सिंग शालेय स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुलांच्या गटात ग्रीशम पटवर्धन, यथार्थ बुडामला, अली असगर सुतरवाला, अनिकेत जैस्वार, यज्ञेश खाडे, श्रेयांक मोर्या, प्रज्ञेश पटवर्धन, द्रुव पालव, अरहान खान, धृव पालव आणि रुद्र राणे यांनी तर मुलींच्या गटात दुर्वा गावडे, जान्हवी कदम, अक्षरा पहाडी, अनन्या गौतम, दिव्या श्रॉफ व माया मंडल यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *