
सोलापूर ः संगमेश्वर कॉलेजच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये व एका खेळाडूची खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आर्या यादव हिने १२वी ओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिप, कर्नूल, आंध्र प्रदेश येथे झालेल्या मध्यप्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशविरुद्ध ३ लढती खेळल्या आणि या लढती जिंकून सुवर्ण पदक प्राप्त केले. संकेत धननाईक याने तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा आणि मध्य प्रदेश विरुद्ध ४ राउंड खेळले आणि ते जिंकून सुवर्ण पदक पटकावले. समिहान कुलकर्णी याने गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाविरुद्ध ४ फेऱ्या खेळल्या आणि त्या जिंकून सुवर्ण पदक जिंकले. सुनीता पवार हिने पुणे येथे झालेल्या अस्मिता तायक्वांदो लीग स्पर्धेत पुणे व रत्नागिरी यांच्याशी जिंकून खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा संतोष खेंडे, प्रा विक्रांत विभुते व प्रा शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव प्रा ज्योती काडादी, डॉ श्रीकांत येळेगावकर, सुदेश मालप, प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.