एशियन डायव्हिंग स्पर्धेसाठी सोलापूरच्या तिघांची निवड

  • By admin
  • September 29, 2025
  • 0
  • 41 Views
Spread the love

सोलापूर ः अहमदाबाद येथे सुरू असलेल्या ११व्या एशियन जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेतील डायव्हिंग प्रकारात येथील तिघांची निवड झाली. ऋतिका श्रीराम, ओम अवस्थी व श्रावणी सूर्यवंशी हे निवड झालेले तिघे खेळाडू आहेत.

तसेच ईशा वाघमोडे हिची प्रशिक्षण शिबिरसाठी निवड झाली होती. या खेळाडूंना श्रीकांत शेटे, मनीष भावसार व हरीश अन्नलदास यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुदेश देशमुख, उपाध्यक्ष झुबिन अमारिया व सचिव पार्वतय्या श्रीराम यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *