
छत्रपती संभाजीनगर ः राजस्थान येथे आयोजित केलेल्या सीबीएसई शालेय राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्यूदो संघटनेच्या वाळूज येथील बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाच्या श्रीमती परमेश्वरी देवानी ज्युदो प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू श्रुतकिर्ती मिनीनाथ खलाटे, अनुज माडये, प्रथमेश पवार, ईशान मैड यांची निवड झाली आहे,
हे चारही खेळाडू राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेसाठी राजस्थानला रवाना झाले आहेत. या निवडीबद्दल क्रीडा मंडळाच्या वतीने खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राज्य संघटनेचे सचिव दत्ता आफळे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, लता लोंढे, रामकिशन मायंदे, जिल्हा ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजीत भावे, विश्वास जोशी, डॉ गणेश शेटकर, प्रसन्न पटवर्धन, झिया अन्सारी, विजय साठे, अमित साकला, चंद्रशेखर पोळ, तसेच बजाजनगर क्रीडा मंडळाचे नंदमूरी श्रीनिवास, मनोहर देवानी, अनिल पवार, नामदेव दौड, अभिजीत दळवी, भीमराज रहाणे, अशोक जंगमे, सुधीर काटकर, शैलेश कावळे, सागर घुगे, राज जंगमे, हर्षल महाजन , उषा अंभोरे, ऋतुजा सौदागर, सायली राऊत, सुप्रिया जंगमे, ऋतुजा पाटील, प्रियंका गुप्ता, तृप्ती जंगमे, धनश्री वाळूंज, यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.