
यवतमाळ : जायंट्स इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ येथे नवरात्र उत्सवानिमित्त शालेय गरबा स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते.
सर्वप्रथम दुर्गा मातेची आरती करून स्पर्धेला सुरुवात झाली आरतीमध्ये सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षक वृंद यांनी आरती सादर केली. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेदरम्यान प्रमुख अतिथी म्हणून संगीता टाके व शैलेजा मस्के व शाळेचे मुख्याध्यापक योगेश सिंग चव्हाण, शाळेचे प्रर्यवेक्षक किरण फुलझेले हे उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनाकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये विपुल मरसकोल्हे, प्रमोद महल्ले, सचिन गिरी, समीर कांबळे, गणेश लोखंडे, अतुल ततावार, विक्रम ठाकरे, चंद्रशेखर परचाके, धीरज खोब्रागडे, नरहर शेट्टीवार, कीर्ती देशपांडे, रूपाली वैद्य, हर्षदा काटेखांटे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. परीक्षक म्हणून नेहा शर्मा, ईशा तिवारी, नंदिनी चिटुकले यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दुधात व वैदही गेडाम यांनी केले.
या स्पर्धेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली. इयत्ता सातवी व आठवीच्या मुलींनी आकर्षक व मनोहारी सादरीकरण करून परीक्षकांचे लक्ष वेधत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामध्ये ओजस्वी राठोड, माही कानेरकर, गुंजन घाडगे, कोमल टाके, सोनाक्षी वंजारे, समृद्धी राय, आराध्या आंबीलकर, हर्षाली शिंदे, सई चव्हाण व श्रावणी ठाकरे यांचा प्रथम क्रमांक देऊन त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेची
हेडगर्ल मेहेक मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले.