
जळगाव ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडद्वारे आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली आहे.
अलिबाग येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जळगावच्या १७ वर्षाखालील मुलींच्या गटात नमिता सोनवणे, गौरी जाधव आणि कोमल सपके यांनी आपापल्या वजन गटात कांस्य पदक जिंकले. तसेच मनस्वी पाटील, गौरवी गरुड आणि १७ वर्षाखालील मुलांच्या गटात निषाद तडवी यांनी आपापल्या वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंना जिल्हास्तरीय खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ सचिन वाणी, डॉ सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, विशाल सोनावणे व शारदा पाटिल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.