
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व हौशी कॅरम असोसिएशन ऑफ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मलबेरी कॉटेज, मेटगुताड, महाबळेश्वर, जिल्हा- सातारा येथे महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात ही स्पर्धा रंगणार असून ओएनजीसीने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम मुदत दिनांक १ ऑक्टोबर २०२५ आहे. खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्हा संघटनेमार्फत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई येथे सायंकाळी ६.३० ते ८. ३० दरम्यान नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क करावा.