मुंबई ः जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई शहर आयोजित जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल धारावी येथे नुकत्याच उत्साही वातावरणात पार पडली.
ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षांखालील मुले व मुली अशा वयोगटात घेण्यात आली. स्पर्धेदरम्यान महेश कुंभार मुंबई जिल्हा योगासन स्पर्धा प्रमुख यांनी खेळाडूंना नवीन नियमावली बाबत मार्गदर्शन केले. मुंबई विभाग स्तरीय शालेय योगासन स्पर्धा येत्या ३,४ ऑक्टोंबर रोजी विद्या निकेतन, मनवेल पाडा,विरार,पुर्व ,पालघर येथे होणार आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेते
.
पारंपरिक प्रकार ः १४ वर्षाखालील मुले – १. विनायक पाण्डेय, दी आंध्र एज्यकुेशन सोसायटी स्कूल, १४८ गुण. १४ वर्षांखालील मुली – १. दुर्वा अरुण जाधव, सीताराम मिल कंपाऊड शाळा, १२८ गुण.
१७ वर्षाखालील मुले – १. प्रणव तुषार विचारे, सीताराम मिल कंपाउंड स्कूल, १२६ गुण. १७ वर्षांखालील मुली – १. नारायणी या वझे, वलसीगहम स्कूल, १२४.५ गुण.
१९ वर्षांखालील मुले – १. हितांश देढीया, शिशुवन स्कूल ११०.५गुण.
कलात्मक एकल प्रकार (आर्टिस्टिक सिंगल)
१४ वर्षांखालील मुले – १. हियांश चिराग पोलादीय, शिशुवन स्कूल, १३९ गुण. १४ वर्षाखालील मुली – १. दुर्वा जाधव, सीताराम मिल कंपाऊड शाळा, १५०.५ गुण.
१७ वर्षाखालील मुले – १. कृष्णा गुप्ता, गुरुनानक हाईट सेकन्डरी स्कूल, १५६ गुण. १७ वर्षाखालील मुली – १. तीर्थ शाह, वलसिंगहम स्कूल, १०५ गुण.
१९ वर्षांखालील मुले – १. हितांश देढीया, शिशुवन स्कूल, १०५ गुण. १९ वर्षांखालील मुली – १. नैत्राली रमाकांत जोशी, डी जी रुपारेल कॉलेज, १८२ गुण.
तालात्मक जोडी (रिदमिक पेअर) प्रकार
१४ वर्षांखालील मुले – १. विक्रांत राणा, भोलेनाथ चव्हाण, नाडकर्णी पार्क, म्य यू पी हिंदी स्कूल, १५८ गुण. १४ वर्षांखालील मुली – १. साईशा शाह, झिया जैन, क्वीन मेरी स्कूल, १९२ गुण.
कलात्मक जोडी (आर्टिस्टिक पेअर) प्रकार
१४ वर्षाखालील मुले – १. विराज देढीया, विराट गडा, शिशुवन स्कूल, ३०८.५ गुण. १४ वर्षाखालील मुली – १. साईशा शाह – झिया जैन, क्वीन मेरी स्कूल, ३१३ गुण.