
जळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने तसेच जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी शुक्रवारी (३ ऑक्टोबर) कांताई सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या निवड चाचणीत १८ व २१ वर्षाखालील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. १८ वर्षाखालील गटाकरिता खेळाडूचा जन्म २ नोव्हेंबर २००७ रोजी वा त्यानंतर झालेला असावा, तर २१ वर्षाखालील गटाकरिता खेळाडूचा जन्म २ नोव्हेंबर २००४ रोजी वा त्यानंतर झालेला असावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी वार्षिक जिल्हा नोंदणी फी १०० रुपये, वार्षिक राज्य नोंदणी फी १०० रुपये आणि स्पर्धा प्रवेश फी १०० रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. या चाचणीतून पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य संघात संधी मिळणार असून त्यानंतर ग्वाल्हेर येथे १ ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी खेळाडूंनी मंजूर खान (९९७०६४७८६८) व सैय्यद मोहसिन (७०२०६७३३५७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.