
नागपूर ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरतर्फे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अभ्यंकर नगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींचा गटात चेतना हेमने, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात हर्ष कांबळी, महेश चौहान व १९ वर्षांखालील मुलांचा गटात रवींद्र चोपकर, प्रियांशू कठाने, जिग्नेश अडकने या सहा खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत यश संपादन केले.
या शानदार कामगिरीमुळे या सहा खेळाडूंची निवड वरोरा, चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी झाली आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रणय सुखदेवे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, मुख्याध्यापिका डॉ वंदना बडवाईक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.