
पुणे : पुणे येथे आयोजित २२व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत पुणे शहर संघाने शानदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले. कोल्हापूर संघाने उपविजेतेपद संपादन केले. सांगली संघाने तृतीय क्रमांक मिळवला. किशोर गटात पिंपरी चिंचवड संघ अव्वल ठरला.
शिवशंकर सभागृह महर्षी नगर पुणे येथे लाठी-काठी, तलवारबाजी, भाला चालवणे, दांडपट्टा,सुरूल इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनच्या मान्यतेने सिलंबम असोसिएशन पुणे आयोजित २२व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून ३५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत कुमार वयोगटात पुणे शहर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, कोल्हापूर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, सांगली संघाने तृतीय क्रमांक पटकावला. किशोर गटामध्ये पिंपरी चिंचवड संघाने प्रथम क्रमांक पटकावला, पुणे ग्रामीण संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, ठाणे संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

प्रशिक्षकांचा सन्मान पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी प्रशिक्षक व जिल्हा प्रतिनिधींना सन्मानित केले. बक्षीस वितरण समारंभासाठी महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश कंठाळे, महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कुंडलिक कचाले, मुंबई उपनगर जिल्हा प्रतिनिधी सुग्रीव पांडेकर, ठाणे जिल्हा प्रतिनिधी सेल्वमणीकंदन, सांगली जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत देवकुळे, कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी पाटील, लातूर जिल्हा प्रतिनिधी आबू चाऊस उपस्थित होते.
सर्व विजय संघातील खेळाडूंना डॉ संजय जाधव, ओंकार सोनवणे, शक्तीप्रसाद पात्रा, अथांग गोणेकर, प्रणिष गायकवाड, पार्थ इनामदार, भूषण बोडखे, शंतनू उभे, संध्या खजे, आरती पांडेकर, चंद्रशेखर महाले, स्वप्निल मोरे, ओम संघपुल्लम, स्नेहल शिंदे, पूजा मोरे, अवंती सकुंडे, प्रतीक्षा कांबळे, मानसी भिसे, सानिका टाकळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.