लातूरच्या तलवारबाजांचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका

  • By admin
  • September 30, 2025
  • 0
  • 81 Views
Spread the love

सुवर्ण, कांस्य पदकांची कमाई

लातूर ः भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३व्या ज्युनिअर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील जान्हवी जाधव, रोहिणी पाटील, वैभवी माने व माही अरदवाड यांनी इप्पी प्रकारातील संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचबरोबर जान्हवी गणपतराव जाधव हिने वैयक्तिक गटातही अप्रतिम खेळ करत सुवर्णपदकाची कमाई केली तर त्याचप्रमाणे माही किशोर अरदवाड हिने वैयक्तिक कांस्य पदकाची कमाई केली. मुलांच्या गटात साईप्रसाद जंगवाड, हर्ष सोमवंशी, साकिब शेख व महात्मे ऋषिकेश यांनी दमदार खेळ करीत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

विशेष म्हणजे या स्पर्धेत शानदार कामगिरीच्या जोरावर जान्हवी गणपतराव जाधव व माही किशोर अरदवाड या दोघींची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे लातूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा दत्ता गलाले, वजीरोद्दीन काझी, मोसिन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत खेळाडूंचे जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, संतोष कदम, वैभव कज्जेवाड, मेहफूजखान पठाण लातूरच्या सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *