
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत संत तुकाराम महाराज महाविद्यालय, कन्नड व मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रीपाद हराळ ४ सुवर्णपदकांसह सर्वोत्कृष्ट किताबाचा मानकरी ठरला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या जिम्नास्टिक सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन अॅड प्रसन्ना पाटील, प्राचार्य डॉ मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे आयोजक म्हणून डॉ सुहास यादव (संत तुकाराम महाविद्यालय) यांनी काम पाहिले.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स पुरुष अंतिम निकाल
वैयक्तिक सर्वोत्कृष्ट किताब : १. श्रीपाद हराळ (एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय), २. तनिष्क राजेगावकर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), ३. श्रीरंग लोखंडे (देवगिरी महाविद्यालय).
फ्लोअर एक्सरसाइज ः १. श्रीपाद हराळ, २. तनिष्क राजेगावकर, ३. आर्य शहा (सरस्वती भुवन महाविद्यालय).
पोमेल हॉर्स ः १. श्रीपाद हराळ, २. तनिष्क राजेगावकर, ३. स्मित शहा (सरस्वती भुवन महाविद्यालय).
स्टील रिंग्स ः १. श्रीपाद हराळ, २. तनिष्क राजेगावकर, ३. श्रीरंग लोखंडे (देवगिरी महाविद्यालय).
व्हाल्टिंग टेबल ः १. तनिष्क राजेगावकर, २. श्रीपाद हराळ, ३. दीपक अर्जुन (देवगिरी महाविद्यालय).
पॅरलल बार्स ः १. तनिष्क राजेगावकर, २. श्रीपाद हराळ, ३. श्रीरंग लोखंडे.
हॉरिझॉंटल बार ः १. श्रीपाद हराळ, २. तनिष्क राजेगावकर, ३. विश्वेश जोशी (सरस्वती भुवन महाविद्यालय).
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स महिला गट अंतिम निकाल
वैयक्तिक सर्वोत्कृष्ट किताब ः १. रिद्धी हत्तेकर (देवगिरी महाविद्यालय), २. सिद्धी हत्तेकर (देवगिरी महाविद्यालय), ३. गौरी कलाने (एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय).
व्हाल्टिंग टेबल ः १. सिद्धी हत्तेकर, २. रिद्धी हत्तेकर, ३. गौरी कलाने.
अनइव्हन बार्स ः १. मानसी देशमुख (एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालय), २. रिद्धी हत्तेकर, ३. सुहानी आदने (देवगिरी महाविद्यालय).
बॅलन्सिंग बीम ः १. रिद्धी हत्तेकर, २. सिद्धी हत्तेकर, ३. मानसी देशमुख.
फ्लोअर एक्सरसाइज ः १. रिद्धी हत्तेकर, २. सुहानी आदने, ३. गौरी कलाने.