
नाशिक कर्णधारपदी आदित्य वाघ
नाशिक ः महाराष्ट्र लगोरी असोसिएशन व नाशिक जिल्हा लगोरी स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक आयोजित जिल्हास्तरीय सीनियर अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे उत्साह संपन्न झाली. त्यामध्ये क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावत प्रथम पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख व लगोरी राष्ट्रीय पंच विलास गायकवाड, रमेश वडघुले, साजिद शेख, सागर पवार ,संजय बागुल आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, पेठ, येवला, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित होते.
राष्ट्रीय पंच विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना लगोरी नियम व माहिती सांगितली. या स्पर्धेचा अंतिम सामना क्रीडा सह्याद्री निफाड आणि योगेश्वर विद्यालय दावसवाडी यांच्यात झाला. यात क्रीडा सह्याद्रीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळवले. मुलींचा अंतिम सामना क्रीडा सह्याद्री आणि जिजामाता कन्या विद्यालय लासलगाव यांच्यात झाला. यात क्रीडा सह्याद्रीच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करुन विजेतेपद संपादन केले.
राज्यस्तरीय लगोरी स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य वाघ, नूतन शर्मा, नीरज तवर, सुमेध बोदडे, सक्षम गायकवाड, आदित्य आहेर यांची राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, क्रीडा सह्याद्री फाउंडेशनचे सदस्य विनोद गायकवाड, चेतन कुंदे, दत्तू रायते, रमेश वडघुले, प्रतीक्षा कोटकर, अनिता बनकर, विजय घोटेकर, कीर्ती कोटकर, श्याम चौधरी, लखन घटमाळे, संदीप बोरसे यांनी सर्वांचे अभिनंदन केले .क्रीडा मार्गदर्शक विलास गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.