
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे दिवाळी सुट्टीत होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या निवड चाचणीचा तिसरा टप्पा ५ ऑक्टोबर रोजी दादर-पश्चिम येथे होणार आहे.
प्राथमिक स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण आठ पुरस्कार दिले जाणार आहेत. सदर निवड चाचणीमधील निवडक खेळाडूंना अंतिम टप्प्यासाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.
आनंदराव अडसूळ ट्रस्ट व आयडियल अकॅडमीच्या गेल्या वर्षभरात शालेय कॅरम स्पर्धेमध्ये चमकलेल्या मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील शालेय मुलामुलींनी डीएसओ स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. म्हणून खेळाडूंचा दर्जा आणखी वाढविण्यासाठी मोफत मार्गदर्शनासह कोकण कप शालेय कॅरम अनुषंगाने २५ ऑक्टोबरपासून स्पर्धात्मक खेळाचे आयोजन केले आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी संघटन समितीचे सचिव प्रमोद पार्टे अथवा चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे १ ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा.