
दिशा कासट सामनावीर
नागपूर ः रायपूर येथे झालेल्या छत्तीसगड कप इन्व्हिटेशनल टी २० क्रिकेट स्पर्धेत विदर्भ सिनियर महिला संघाने शानदार कामगिरी बजावत विजेतेपद पटकावले.
रायपूर येथील वीर शहीद नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भ महिला संघाने तामिळनाडू संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. विदर्भाच्या गोलंदाजांनी प्रथम तमिळनाडू संघाला २० षटकांत केवळ सहा बाद १०६ धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार दिशा कासट आणि रिद्धी नाईक यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत शानदार विजय मिळवला. दिशाने निवृत्त होण्यापूर्वी ७३ धावा केल्या आणि विदर्भाने ५.४ षटके शिल्लक असताना विजय मिळवला.
दिशाने ३८ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह ७३ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खादीर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ सिनियर महिला संघासाठी हंगामाची सुरुवात चांगली झाली.
विदर्भ महिला संघाने लीग टेबलमध्ये १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. पाच लीग सामन्यांपैकी चार जिंकले. विदर्भने यजमान छत्तीसगड, मध्य प्रदेश, बंगाल आणि झारखंडचा पराभव केला. विदर्भाचा एकमेव पराभव लीग टप्प्यात तामिळनाडूविरुद्ध होता आणि त्यांनी अंतिम सामन्यात त्याचा बदला घेतला.
दिशा २४९ धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली, तर मोना मेश्रामने १७४ धावा केल्या. दिशाने स्पर्धेत सर्वाधिक १५ षटकार (१५) मारले. कोमल झंझाद १२ बळींसह विदर्भाची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली.
विदर्भ संघाचा स्पर्धेतील प्रवास
२८ सप्टेंबर : बंगालचा ६ विकेट्सने पराभव
२६ सप्टेंबर : मध्य प्रदेशचा १६ विकेट्सने पराभव धावा
२५ सप्टेंबर : छत्तीसगडवर ९ विकेटनी विजय
२२ सप्टेंबर : तामिळनाडूकडून ३ विकेटनी पराभव
२१ सप्टेंबर : झारखंडवर ७४ धावांनी विजय