
छत्रपती संभाजीनगर ः मनपा हद्दीतील शालेय जिल्हास्तरीय १४ वयोगटाखालील मुलींच्या बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मंगळवारी शानदार सुरुवात झाली.
या स्पर्धेत मुलींचे तब्बल ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या औपचारिक उदघाटन प्रसंगी घेण्यात आलेल्या पोद्दार सीबीएसई विरुद्ध सरस्वती भुवन शाळेच्या सामन्याची टॉस करून सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद तालुका व जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव मंजित दारोगा, औरंगाबाद जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव गणेश कड, स्पर्धा प्रमुख सचिन परदेशी, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे बास्केटबॉल विभाग प्रमुख पंकज परदेशी, समाधान बेलेवार, आकाश टाके, विजय मोरे, धनंजय कुसाळे, दिनेश जायभाये, महेश इंगळे, प्रशांत बुंदेले, सौरभ ढीपके, सुरज कदम, आकाश टाके, अभय हजारी, अभय चव्हाण आदी उपस्थित होते.