
कन्नड (प्रवीण शिंदे) ः छत्रपती संभाजीनगर येथे औरंगपुरा भागात असलेल्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापकपदी कृष्णा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शारीरिक शिक्षण शिक्षक कृष्णा शिंदे यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण (प्राथमिक) यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल ललिता मगरे, दादासाहेब गजहंस, माजी मुख्याध्यापक सीमा बेगम, सायरा शेख, दादाराव गायकवाड, चेतना तायडे, मनीषा कोळी, ज्योती पवार, आयशा बेगम,तुषार चव्हाण, संपदा शिंदे, स्वप्नील लोखंडे यांनी अभिनंदन केले आहे.