
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः दादासाहेब, आदर्श जैन सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या पहिल्या सामन्यात साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघाने एमई क्रिकेट अकादमी संघाचा पाच विकेट राखून पराभव केला. दुसऱया सामन्यात असरार ११ संघाने मायटी ग्लॅडिएटर्स संघावर २२ धावांनी विजय नोंदवला. या लढतींमध्ये दादासाहेब व आदर्श जैन यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. साऊथ वेस्ट मल्टीमीडिया संघाने प्रथम फलंदाजी करत १६ षटकात सात बाद १०७ असे माफक लक्ष्य उभे केले. साऊथवेस्ट मल्टीमीडिया संघाने १४ षटकात पाच बाद १०८ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात दादासाहेब (३७), संकेत पगारे (३१), विन्सेंट स्वामी (१७) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत दादासाहेब याने १७ धावांत तीन विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. या शानदार कामगिरीमुळे दादासाहेबला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रज्वल अंधारे याने १६ धावांत दोन गडी बाद केले. अर्जुन पटेल याने २२ धावांत दोन बळी घेतले.

मायटी ग्लॅडिएटर संघ पराभूत
दुसरा सामना असरार ११ आणि मायटी ग्लॅडिएटर यांच्यात झाला. हा सामना असरार ११ संघाने २२ धावांनी जिंकला. या सामन्यात आदर्श जैन हा सामनावीर ठरला.
असरार ११ संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १८८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मायटी ग्लॅलिएटर्स संघाने २० षटकात नऊ बाद १६६ धावा काढल्या.
या सामन्यात आदर्श जैन याने सर्वाधिक ७३ धावा फटकावत सामना गाजवला. त्याने सात चौकार व एक षटकार मारला. कार्तिक बाकलीवाल याने तीन उत्तुंग षटकार व दोन चौकारांसह ३९ धावांची आक्रमक खेळी केली. शेख आतिफ याने तीन चौकारांसह ३७ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत मुस्तफा शाह (३-१९), झमीर (३-४१) व राजेंद्र चोपडा (२-१६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.