
छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि एस. डी. कॉलेज सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मौलाना आझाद कॉलेज संघाने सात पदके जिंकून स्पर्धा गाजवली.
पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंग स्पर्धेत १ रौप्यपदक जिंकले. तसेच विविध श्रेणींमध्ये बेस्ट फिजिकमध्ये १ सुवर्णपदक, २ रौप्यपदक आणि १ कांस्यपदक जिंकले. मौलाना आझाद कॉलेजने एकूण ७ पदके पटकावली.
या शानदार कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ मजहर अहमद फारुकी आणि उपप्राचार्य डॉ आरेफ पठाण यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रशिक्षक अकबर खान, संघ व्यवस्थापक डॉ हसन झमा खान, क्रीडा समितीचे आसिफ पटेल आणि शेख अझहर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.