
छत्रपती संभाजीनगर ः इगल स्टार शूटिंग अकॅडमी येथे विजयादशमीनिमित्त शस्त्र पूजन करण्यात आले. आयएसएसएफचे ज्युरी हेमंत मोरे आणि प्रीती घाटे यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यातील सुसज्ज अशी रायफल पिस्टल शूटिंग रेंजमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंसाठी प्रशिक्षण दिले जाते. या खेळासाठी पुणे, मुंबई, बंगळुरू अशा मोठ्या शहरात खेळाडूला प्रशिक्षणासाठी जावे लागत होते. शूटिंग रेंज शहरातच आणि सर्वसुविधा असलेल्या रेंजमुळे रायफल पिस्टल खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वयाच्या १० वर्षांपासून पुढे या खेळाचे प्रशिक्षण घेऊ शकतात, असे इगल स्टार शूटिंग अकादमीचे डायरेक्टर तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुंदर घाटे यांनी सांगितले आहे.