जागतिक हृदय दिनानिमित्त सायक्लोथॉन जल्लोषात संपन्न

  • By admin
  • October 3, 2025
  • 0
  • 129 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः जागतिक हृदय दिनानिमित्त सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आणि एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी कार्डिओ वास्क्युलर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायक्लोथॉन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

डॉ वैभव कापरे, डॉ विजय व्यवहारे, डॉ संतोष ढोबळ आणि डॉ अभिषेक मिश्रा यांच्या हस्ते राईडला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. राईड एमजीएम हॉस्पिटल पासून सुरू होऊन ७ हिल्स मार्गे, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंपच्या मार्गाने परत तसाच मार्ग घेऊन संपन्न झाली.

या सायक्लोथॉनचे मुख्य उद्दिष्ट समाजात हृदय रोगाविषयी जनजागृती करणे होते. यावेळी डॉ विजय व्यवहारे यांनी सांगितले की, आजकाल तरुण वयात हृदय रोगाचे प्रमाण वाढले आहे, पण योग्य योग, आहार, जीवनशैली, व्यायाम आणि सायकल चालवणे, चालणे, धावणे यामुळे हृदय विकार टाळता येऊ शकतात.

सायक्लोथॉनमध्ये जवळपास ५० सायकलिस्ट्स, तसेच फिजिओथेरपी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. राईड यशस्वी करण्यासाठी डॉ. विभूती तिवारी, विश्रांती गायकवाड आणि प्रसाद कोळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

राईडमध्ये उपस्थित प्रमुख सहभागी होते. त्यात डॉ विजय व्यवहारे, डॉ वैभव कापरे, डॉ संतोष, डॉ विभूती तिवारी, जयंत सांगवीकर, डॉ अरुण गावंडे, सदानंद नागपूरकर, प्रसाद कोळेकर, धनंजय भाले, सचिन जोशी, मनोज वडगावकर, भगवान मगर, अनिल टाकळीकर, विश्रांती, प्रमोद सुर्वे, प्रणिता बर्दापूरकर, सतीश अन्वेकर, संजय शिंदे, संतोष हिरेमठ, अश्विनी गजभरे, मल्लिकार्जुन स्वामी, प्रवीण शेजुल, हेमंत भावसार, सचिन गोडसे, वैभव तांबे, श्रद्धा बोराटवर, अक्षता माने, वृंदा चरखा, युतिका भुतडा, धनश्री मरळ, सेजल कुकरेजा, हेतल पटेल, वैष्णवी, रोहिणी पाटील, हर्षिता, मृणाल वानखेडे, चारुल दंडाळे, भक्ती काकड, सानिका खवसे, तेजस जोशी आणि दिव्य पाटील यांचा समावेश आहे.

हा उपक्रम फक्त एक सायकल राईड नव्हता, तर समाजात हृदय आरोग्याबद्दल जागरुकता वाढवण्याचा एक महत्त्वाचा संदेश ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *