शालेय जलतरण स्पर्धेत एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे खेळाडू चमकले

  • By admin
  • October 3, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

विविध प्रकारात घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर ः आंतरशालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत एमपीपी स्पोर्ट्स पार्कच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात शिवानंद कुलकर्णी याने ५० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात तिसरा, १०० मीटर फ्रिस्टाइल प्रकारात दुसरा आणि २०० मीटर फ्रिस्टाइल प्रकारात पहिला क्रमांक मिळवला. शिवानंद हा व्हीआरएस स्कूलमध्ये शिकत आहे.

देवगिरी कॉलेजचा विद्यार्थी श्रेयस कुलकर्णी याने १९ वर्षांखालील गटात तीन सुवर्णपदके पटकावली. त्याने २०० मीटर वैयक्तिक मेडले, २०० मीटर बटरफ्लाय आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक अशा तीनही प्रकारात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली.

गोदावरी पब्लिक स्कूलच्या दिगंबर घुंगासे याने दोन सुवर्ण व एक रौप्य अशी तीन पदके जिंकली. त्याने ४०० मीटर फ्रिस्टाइल व २०० मीटर बटरफ्लाय या प्रकारांत सुवर्णपदक आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्य अशी तीन पदके जिंकली.

पीएसबीए इंग्लिश स्कूलच्या गणेश नागरगोजे याने १४ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदक जिंकले. त्याने ५० मीटर फ्रिस्टाइल व १०० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

सेंट लॉरेन्स शाळेच्या युग वहातुळे याने १४ वर्षांखालील गटात तीन पदकांची कमाई केली. त्याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात द्वितीय, १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात द्वितीय आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत तीन पदकांची कमाई केली.

एसबीओए पब्लिक स्कूलच्या इंद्रनील बळी याने १७ वयोगटात तीन पदके पटकावली. त्याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात प्रथम, ४०० मीटर फ्रिस्टाइल प्रकारात प्रथम आणि २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून २ सुवर्ण व १ रौप्य पदक जिंकले.

मिलिंद कॉलेजच्या साक्षी पाठारे हिने १९ वयोगटात दोन सुवर्णपदक जिंकले. तिने ५० मीटर फ्रीस्टाइल आणि १०० मीटर फ्रीस्टाइल या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

उद्धवराव पाटील स्कूलच्या करण मते याने १७ वयोगटात १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात कांस्यपदक जिंकले.

१४ वयोगटात श्रुती आखाडे हिने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक जिंकले. श्रुती द जैन इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे.

एसबीओए पब्लिक स्कूलच्या राजेश मिटकरी याने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक संपादन केले. त्याने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्ण व २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात रौप्य अशी तीन पदके जिंकली.

द जैन इंटरनॅशनल स्कूलच्या रुपेश आखाडे याने १७ वयोगटात २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक जिंकले.

एमजीएम क्लोवर डेल स्कूलच्या त्रिशी सोनवणे हिने १७ वयोगटात १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक पटकावले.

देवगिरी कॉलेजच्या कल्पेश आखाडे याने १९ वयोगटात दोन पदकांची कमाई केली. त्याने १५०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्ण व ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य अशी दोन पदके जिंकली.

हे सर्व पदक विजेते खेळाडू एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे जलतरण तलावावर दररोज सराव करतात. या शानदार कामगिरीबद्दल एमपीपी स्पोर्ट्स पार्कचे संचालक विनायक पांडे, डॉ मकरंद जोशी, अॅड गोपाल पांडे आणि अॅड संकर्षण जोशी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूंना प्रशिक्षक सागर बडवे, राजीव बडवे, कांचन बडवे, अनिता सिन्नरकर व प्रणव मिटकरी यांनी मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *