
मुंबई ः आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे दिवाळी सुट्टीत होणाऱ्या कोकण कप विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेच्या निवड चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात ५ ऑक्टोबरपासून शालेय ८२ खेळाडूंमध्ये चुरस राहील. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व कोकण क्रीडा प्रबोधिनी सहकार्यीत स्पर्धेचा उद्घाटनीय सामना विराज बर्वे विरुध्द समर्थ मोरे यामध्ये दादर-पश्चिम येथे रंगणार आहे. प्राथमिक स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण आठ पुरस्कार दिले जाणार आहेत.
महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेची राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमेर पठाण, डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, शारदाश्रम विद्यामंदिर-दादरचा आरव अंजर्लेकर, कनोसिया हायस्कूलची वेदिका पोमेंडकर, कळसुलकर इंग्लिश स्कूल-सावंतवाडीचा भारत सावंत, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने व नील म्हात्रे आदी शालेय कॅरमपटूमध्ये विजेतेपदासाठी अटीतटीचे सामने होतील. गेल्या वर्षभरात आयडियल शालेय कॅरम स्पर्धेमध्ये चमकलेल्या मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातील शालेय मुलामुलींनी डीएसओ स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली. म्हणून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी मोफत मार्गदर्शनासह कोकण कप शालेय कॅरम अनुषंगाने २५ ऑक्टोबरपासून स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन केले आहे.