
नागपूर ः मोहाली (नवीन चंदीगड) येथे ८ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या सीनियर महिला टी २० ट्रॉफी एलिट ग्रुप ‘अ’ लीग सामन्यांमध्ये दिशा कासट १६ सदस्यीय विदर्भ संघाचे नेतृत्व करणार आहे. व्हीसीएच्या महिला निवड समितीने महिला संघ जाहीर केला असून दोन स्टँडबाय खेळाडूंची निवड केली आहे.
विदर्भ महिला संघात दिशा कासट (कर्णधार), भारती फुलमाळी (उपकर्णधार), लतिका इनामदार, रिद्धिमा मरदवार, मोना मेश्राम, अंकिता भोंगाडे, मानसी पांडे, कांचन नागवाणी, नुपूर कोहळे, आरती बेहेनवाल, तृप्ती लोढे, श्रेया लांजेवार, रिद्धी नाईक, कोमल झांजड, आर्या गोहणे, गार्गी वानकर यांचा समावेश आहे. राखीव खेळाडू म्हणून आयुषी ठाकरे आणि सायली शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.