
नागपूर ः हरियाणा येथे ९ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या १९ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफी (एकदिवसीय सामना) एलिट ग्रुप ‘अ’ लीग सामन्यांसाठी विदर्भाच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व यश तित्रे हा करणार आहे.
शुक्रवारी चंद्रशेखर आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हीसीएच्या ज्युनियर निवड समितीने स्पर्धेसाठी पाच स्टँडबाय खेळाडूंची देखील निवड केली आहे.
विदर्भ संघात यश तित्रे (कर्णधार), गौरव निकम (उपकर्णधार), कुश शर्मा, कुश खंडेलवाल, कृष्णा तिवारी, मल्हार डोसी, अध्यान रौथम, अथर्व भांबरे, अर्णव लुंगे, हिमांशू कावळे, ओम धोत्रे, सार्थक धबडगावकर, पार्थ खुरे, ऋषित पंचमिया, सिद्धार्थ गुप्ता या खेळाडूंचा समावेश आहे. राखीव खेळाडू म्हणून करण डिक्कर, सोहम देव, साईश भिसे, क्रिश सोनकुसरे, ओम लुथडे यांची निवड करण्यात आली आहे. विशाल महाडिक हे प्रशिक्षक व हर्षद हुद्दार हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत.