
पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा (१४ वर्षे मुले, १९ वर्षे मुले व मुली गट) जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ येथे सुरू झाली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवम फाउंडेशनचे अध्यक्ष जयसिंग मोहिते, कार्याध्यक्ष प्रकाश रेणुसे व रशियन बॉक्सर अलेक्झांडर शिरोबोकोव यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले तर आंतरराष्ट्रीय कोच व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर यांनी आभार मानले.
यावेळी धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव मयूर बोरसे, राष्ट्रीय बॉक्सर विशाल गव्हाणे, राम जगताप, विशाल भिलारे, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरज गायकवाड, जीवनलाल निंधाने तसेच शिरूर येथील क्रीडा पत्रकार शौकत मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजेत्या खेळाडूंची निवड येत्या १४ ते १६ सप्टेंबर रोजी त्याच मैदानावर होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी होणार आहे.
स्पर्धेतील प्राथमिक फेरीचे काही निकाल
२८ ते ३० किलो गट : रोहित शेणगळ (एन एस बी फुलगाव) विजयी विरुद्ध श्री तेज कांचन (एंजल स्कूल, उरुळी कांचन).
३८ ते ४० किलो गट : संस्कार धस (एंजल स्कूल, उरुळी कांचन) विजयी विरुद्ध देवदत्त सरोदे (न्यू इंग्लिश स्कूल, कवठे यमाई).
३८ ते ४० किलो गट : आयुष बनसुडे (एल जी बनसोडे स्कूल, पळसदेव) विजयी विरुद्ध दक्ष सिनलकर (श्री सिद्धिविनायक, शिक्रापूर).
३८ ते ४० किलो गट : द्विज शेळके (नालंदा स्कूल, मंचर) विजयी विरुद्ध सात सय्यद (एंजल स्कूल, उरुळी कांचन).
४२ ते ४४ किलो गट : श्रीवर्धन कदम (एंजल स्कूल, उरुळी कांचन) विजयी विरुद्ध प्रसन्नजीत झेंडे (एंजल स्कूल, उरुळी कांचन).
या स्पर्धेतील उत्साहवर्धक लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी झाली होती.