
कन्नड : कन्नड तालुका शालेय कबड्डी मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ रामचंद्र पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य प्रवीण शिंदे, तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोस्वामी, क्रीडा मार्गदर्शक अविनाश काळे, स्वामी प्रणव नंद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बी एस पाटील तसेच क्रीडा शिक्षक किशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी डॉ पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात खेळाचे महत्त्व पटवून सांगितले. “खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि निरोगी जीवन जगण्यासाठी खेळ आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात महात्मा फुले हायस्कूल पिशोरने विजेतेपद पटकावले, तर संत बहिणाबाई चौधरी इंग्लिश स्कूल देवगाव रंगारी उपविजेता ठरला. १७ वर्षाखालील गटात नवजीवन आश्रम शाळा आंबा तांडा संघाने विजेतेपद मिळवत वर्चस्व सिद्ध केले, तर वसंतराव नाईक माध्यमिक शाळा तेलवाडी उपविजेता ठरली. १९ वर्षाखालील गटात विनायकराव पाटील महाविद्यालय कन्नडने विजेतेपद पटकावले, तर नवजीवन ज्युनिअर कॉलेज आंबा तांडा उपविजेता ठरले.
सामन्यांचे पंच म्हणून कडूबा चव्हाण, राकेश निकम, प्रशांत नवले, सचिन शेळके, संदीप बागुल, देवरे सर व बुरुकुल सर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या स्पर्धेत नवजीवन आंबा तांडा संघाचे वर्चस्व ठळकपणे जाणवले.