सुबोध देशपांडे, सारिका वर्दे, मयुरी दीक्षित व वीणा जोशी यांना विजेतेपद

  • By admin
  • October 4, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे ः जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रौढांच्या तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या सुबोध देशपांडे, सारिका वर्दे, मयुरी दीक्षित व वीणा जोशी यांनी विजेतेपद पटकावत शानदार कामगिरी केली.

जळगाव येथील एम जे महाविद्यालयात जळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सुबोध देशपांडे यांनी ८० वर्षावरील गटातील अंतिम लढतीत नाशिकच्या सतीश शिरसाठ यांचा १३-११,११-८,१३-१५,६-११,११-७ असा निसटता पराभव केला.

महिलांच्या ७० वर्षावरील गटात वीणा जोशी यांनी अंतिम सामन्यात पुण्याच्या मनीषा बोडस यांना ११-५,११-८,९-११,११-९ असे पराभूत केले तर ४० वर्षावरील गटात मयुरी दीक्षित यांनी यवतमाळच्या स्नेहल भोळे यांच्यावर ११-७,११-५,९-११,११-८ अशी मात केली. ४५ वर्षांवरील गटात सारिका वर्दे यांनी ठाण्याच्या श्रुती जोशी यांच्यावर ११-९,११-७,१५-१३ असा सरळ तीन गेम्स मध्ये विजय मिळवला.

या स्पर्धेतील अन्य अंतिम निकाल

महिला साठ वर्षावरील – मनीषा प्रधान (टी एस टी) विजयी विरुद्ध स्वाती अघारकर (नाशिक) ११-८,११-९,९-११,११-५. पन्नास वर्षावरील – सुषमा मोगरे (ठाणे) विजयी विरुद्ध शिवप्रिया नाईक (ठाणे) ११-७,११-८,११-७. ६५ वर्षांवरील राजेश्वरी म्हेत्रे (टीएसटी) विजयी विरुद्ध रंजना पत्की (पुणे ) ११-८,११-४,६-११,१२-१०.
पुरुष ७० वर्षावरील शिवानंद कुंडजे (नाशिक) विजयी विरुद्ध जितू मवानी (मुंबई) १०-१२,१०-१२,११-६, ११-८, ११-६. ७५ वर्षावरील सतीश कुलकर्णी (मुंबई) विजयी विरुद्ध पिनाकिन संपत (मुंबई) ११-८,८-११,११-१३,११-६,१४-१२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *