
छत्रपती संभाजीनगर ः शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला, शिवराई (ता. वैजापूर) येथील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकांची कमाई केली.
१४ वर्षांखालील गटात ३६ किलोग्राम वजनगटात श्रावणी गणेश डिके हिने सुवर्णपदक, ४२ किलोग्राम गटात दीक्षा बाबासाहेब त्रिभुवन हिने सुवर्णपदक, तर ५० किलोग्राम गटात अक्षरा प्रकाश डिके हिने रौप्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील गटात ४० किलोग्राम वजनगटात मयुरी गणेश चव्हाण हिला रौप्यपदक, तर ४६ किलोग्राम गटात साक्षी महेश गोचिडे हिला कांस्यपदक मिळाले. १९ वर्षांखालील गटात ६२ किलोग्राम वजनगटात स्नेहल शामसुंदर बागुल हिने रौप्य पदकाची कमाई केली.यापैकी सुवर्णपदक विजेत्या श्रावणी डिके आणि दीक्षा त्रिभुवन यांची विभागीय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक व तालुका क्रीडा संयोजक गजानन गायके यांचे मार्गदर्शन लाभले.खेळाडूंच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक एकनाथ गवळी, रणजितसिंग परदेशी, रत्नाकर पगारे, संदीप तुंबारे, शंकर बलिकोंडवार, सुरेश भुजाडे, बाळासाहेब वानखेडे, राहुल कळंके, राजेंद्र कसबे, पद्मा कळसकर, भाग्यश्री मुठे, योगिता जेजुरकर, भीमाबाई पवार तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर आदमने, उपाध्यक्ष रविंद्र त्रिभुवन, योगेश डांगे व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शिवराई प्रशालेच्या कन्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.