
सावली तांगडे, वरद जाधव प्रथम
छत्रपती संभाजीनगर ः जायंटस् क्लब ऑफ चिकलठाणा यांच्या वतीने आ कृ वाघमारे या प्रशालेमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धांचे बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाले. या स्पर्धेत आ कृ वाघमारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग दर्शविला. स्पर्धा दोन वयोगटांमध्ये घेण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटात स्पर्धा झाली.
इयत्ता ५ वी ते ७ वी गटात सावली संदीप तांगडे प्रथम, माधवी विरेंद्र वाकळे द्वितीय, आरध्य भुवनेश्वर गावंडे तृतीय ठरले. विशेष पारितोषिके अवनिका कापसे व जान्हवी विजय पेंढारकर यांना देण्यात आली.
इयत्ता ८ वी ते १० वी गटात वरद बाळासाहेब जाधव प्रथम, उत्कर्ष संतोष शेळके द्वितीय, मनस्वी मनोज बारवाल तृतीय ठरले. विशेष पारितोषिके ऋतुजा राजेंद्र ढेपले व मृणाल कोठुळे यांना देण्यात आली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून व्ही एस पैठणकर आणि गजानन जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशासाठी जायंट्स ग्रुप ऑफ चिकलठाणा यांच्या वतीने मनोरमा मालपाणी, संगीता रुणवाल, स्नेहलता रुणवाल, शिवप्रसाद तोतला, विनोद शेवतेकर, नितीन रुणवाल, गोपाल मालपाणी, प्रकाश रुणवाल, प्रविण कटारिया, त्रिलोक बांठिया, सचिन कोटेचा व नरेश गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेला वाव मिळाला आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले.