
छत्रपती संभाजीनगर ः जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कन्नड तालुक्यातील चिकलठाणच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नाव उंचावले.
१४ वर्षे वयोगटात पुनम कोरडे (५४ किलो) हिने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेस पात्र ठरली. या वयोगटातील फैजान सय्यद (५७ किलो) हिला रौप्यपदक मिळाले.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात किरण काकडे (६० किलो) व सुमित घायतीलक (५१ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले. मुलींच्या गटात भाग्यश्री नागणे (५७ किलो) हिला रौप्यपदक तर मेघा काटकर (६१ किलो) हिला कांस्यपदक मिळाले. या सर्व खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई करत शाळेचा गौरव वाढवला.
जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, कुस्ती मार्गदर्शक मुकुंदवाड आणि क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांनी विजेत्या खेळाडूंना पदके देऊन गौरविले.
कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींनी कन्नड तालुका शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संघाचे कर्णधार तेजस्विनी मार्गमे यांच्या नेतृत्वाखाली आराध्या चव्हाण, दिव्या कोरडे, आयशा बेग, साक्षी समिद्रे, नेहा काटकर, अनुष्का चव्हाण, दीपाली चव्हाण, नेहा चोंधे व पल्लवी पवार यांनी दमदार कामगिरी सादर केली. या संघाचे मार्गदर्शन विजयसिंग बारवाल यांनी केले.
विजेत्या खेळाडूंना प्रशालेचे मुख्याध्यापक हुलराम चिंतलवाड, माजी सैनिक नानाभाऊ चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष प्रवीण साबळे व प्रमोद चव्हाण तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद विनोद सोनवणे, भानुदास पांडव, चंद्रकांत ब्राम्हणे, भावेश पाटील, राजेंद्र भोसले, शामकांत येवले, कालिदास खैरनार, संजय पाटील, संतोष पवार, कांता काळे, दीपाली माडेकर, वैशाली चव्हाण, प्रिया ठाकूर, तारा गांगुर्डे व दीपा पवार यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे चिकलठाणच्या शालेय खेळाडूंच्या मेहनतीला व कौशल्याला अधिक बळकटी मिळाली असून, आगामी स्पर्धांसाठी उत्साह निर्माण झाला आहे.