
छत्रपती संभाजीनगर ः विभागीय क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय किक-बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत डीसीए आणि दिल्ली पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी विविध वयोगटात चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हा व शहर किक-बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तांत्रिक मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मुरलीधर जगताप (संचालक, लोकविकास बँक) व के. व्ही. यादवराव (क्रीडा अधिकारी) यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, गणेश पालवदे (क्रीडा अधिकारी) व अनिल मिरकर (उपाध्यक्ष, स्पोर्ट्स किक-बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य) यांच्या उपस्थितीत झाला. विशेष म्हणजे, यावर्षी प्रथमच जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांना पदके देण्यात आली. या उपक्रमाचे पालक व खेळाडू यांनी कौतुक केले.
स्पर्धेत पंच म्हणून समीक्षा मांजरमे, राजश्री गाडेकर, सिध्दी संत्रे, रशमा शेख, विश्वदिप गिर्हे, देव चालक, कौस्तुभ लोळगे, दत्तात्रय शिंदे, नरेंद्र संतान्से व सुमित जाधव यांनी काम पाहिले.
स्पर्धेत डीसीए आणि दिल्ली पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत वर्चस्व गाजवले. मुलींच्या गटात समृद्धी पालकर, अनुष्का नागदवने, सृष्टी रणवीर, नंदीनी राठोड, सान्वी पवार, तनवी काकडे, तर मुलांच्या गटात यश पवार, विश्वराज फड, विग्नेश जगदाळे, गुरु कत्तरमोरे, अवनिश साळुंके, मंथन आकतुरकर, निपुण सावंत, अमेय सुरे, दिपेश मरखाडे, पिऊश वाकुलकरे आणि सोहम वानकर यांसारख्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विजेत्या खेळाडूंची आगामी विभागीय स्पर्धेसाठी जालना येथे निवड झाली असून, तेथील मैदानावर आता जिल्हा पातळीवरील या विजेत्यांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील किक-बॉक्सिंगला नवे बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सविस्तर निकाल
अंडर १७ मुली
- ३५ किलो ः समृद्धी पालकर, अमृता निघाते. – ४० किलो ः अनुष्का नागदवने, भूमिका बनसोड, इशिका इंगळे, ऋतुजा टकले. -४५ किलो ः सृष्टी रणवीर, संस्कृती वायकर. -५० किलो ः नंदिनी राठोड, अनुष्का येवले, श्रावणी भापकर, वैदही मधेकर. -५५ किलो ः साक्षी जायभाय, आकांक्षा संकुडे, भक्ती वाघ. -६० किलो ः सान्वी पवार. +६० किलो ः ऋतुजा देवरे, तनया पगार, ज्ञानेश्वरी घोकर, क्रिष्णा खुजे.
अंडर १४ मुले
-२८ किलो ः यश पवार, मयंक माली. -३२ किलो ः विश्वराज फड, अवनीश क्षीरसागर, संस्कार कुस्कर, समर्थ राणे. -३७ किलो ः विग्नेश जगदाळे, राजेश गावंडे, समर्थ कदम, दक्ष माळी. -४२ किलो ः स्पर्श हजारे, श्लोक मोतींगे, भूषण कोंडके. -४७ किलो ः गुरू कत्तरमोरे, सर्वज्ञ जाधव, स्वराज शंखपाळ.
अंडर १४ मुली
-१४ किलो ः श्रेया वाडेकर, जयश्री दौड. -३२ किलो ः नंदीनी देसाई, साधना भेसर. -३७ किलो ः ओजल सूर्यवंशी, तेजल अधाने, माही मेंधे, गुंजन शाम भारस्कर. -४२ किलो ः शिवानी चव्हाण, पूर्वा आवारी, स्वरा थोरात. -४६ किलो ः परिनिधी लाटे, कस्तुरी भालेराव, विभावरी अवघडे. -५० किलो ः भाविका भाईमारे.
अंडर १७ मुले
-३५ किलो ः फईम करिम शेख, अवनीश साळुंके, मयुरेश राठोड, प्रथमेश दांडगे. -४० किलो ः राजवर्धन थोरात, यज्ञेश चौधरी, चंद्रकांत अध्दक. -४५ किलो ः ओमकार नागरगोजे, इंद्रजीत गवळी, यथार्थ राठोड, प्रणव गोरे. -५० किलो ः प्रणीत वाडेकर, वेदांत कुंभारे, कृष्णराज नेमाने, यथार्थ माने. -५५ किलो ः सोहम माचीवाल, वेदांत सूर्यवंशी. – ६० किलो ः आयान शेख, विनायक साखरे. – ६५ किलो ः अर्पित यादव, बालाजी नागरगोजे, संस्कार कदम. -७० किलो ः संगमेश्वर कोडमगळ. +७० किलो ः सुमित बहिरे, जय शेलार.
अंडर १९ मुले
-४४ किलो ः विश्वजीत सोळंके. -५२ किलो ः मंथन आकतुरकर. – ५६ किलो ः कुलदीप बहोत. – ६० किलो ः निपुन सावंत. – ६५ किलो ः अमेय सुरे. – ७० किलो ः दिपेश मरखाडे. -७५ किलो ः पियुष वाकुलकरे. +८० किलो ः सोहम वानकर.
अंडर १९ मुली
-४५ किलो ः प्रीती निकम), सृष्टी रेडे. +६३ किलो ः तन्वी काकडे, ऋतुजा कापसे.