
जळगाव ः वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) या महाराष्ट्र फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून आंतर जिल्हा सब ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शिरपूर येथे करण्यात आले होते. ३२ जिल्ह्याच्या स्पर्धेतून ४० खेळाडूंची निवड करण्यात आली होती त्यात जळगाव जिल्ह्याचा उदय स्पोर्ट्स अकॅडमीचा व विवेकानंद शाळेचा विद्यार्थी पार्थ चंद्रशेखर पाटील याची निवड झाली आहे.
मुंबई येथे कुपरेज फुटबॉल ग्राउंडवर ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी त्याला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, संचालक ताहेर शेख व मुख्य प्रशिक्षक राहील अहमद यांची उपस्थिती होती.