
परभणी ः परभणी येथे प्रा शंकर गंधम स्मृती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेत १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपद डॉ रामेश्वर नाईक यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि बालसंज्ञोपन तज्ञ डॉ विशाला पटणम, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश शेळके, डॉ नीलेश पवार, पंडित बरदाळे, अनुराग आंबटी असे परभणीतील प्रसिद्ध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच अनुराज रासकटला यांनी केले. या स्पर्धेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यातून तब्बल १२० बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.